भिवंडीतील नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी - नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

आता नाट्यगृहाच्या देखभाल-दरुस्तीवर मोठा खर्च लागणार असून भिवंडी महापालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्यामुळे महापालिकेला हा खर्च करणे शक्य नसल्याची बाब लक्षात घेऊन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने राज्य सरकारकडून १० कोटींचा निधी मंजूर केला आहे. भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण अष्टिकर यांच्याशी चर्चा करून शिंदे यांनी नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती घेतली आणि तातडीने १० कोटींचा निधी मंजूर करत असल्याचे त्यांना सांगितले. तसेच, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना भिवंडी महापालिकेला १० कोटींचा निधी देण्याचे निर्देश दिले आहेत.  भिवंडी येथील महापालिकेच्या स्वमीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपयांचा निधी देण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. देखभाल-दुरुस्तीअभावी हे नाट्यगृह गेल्या वर्षभरापासून बंद असल्याची बाब लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव (२) मनीषा म्हैसकर यांना नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी १० कोटींचा निधी देण्याचे निर्देश दिलेभिवंडीतील नाट्यरसिकांसाठी २५ वर्षांपूर्वी या नाट्यगृहाची उभारणी झाली. २५ वर्षे या नाट्यगृहाने भिवंडीतील रसिकांना मनोरंजनाचे एक हक्काचे ठिकाण उपलब्ध करून दिले होते. काळाच्या ओघात


Popular posts
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची
महाराष्ट्र एनएसएसच्या १४ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव
मानाच्या काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक.मानाच्या लातूर /प्रतिनिधी :ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त मानाच्या झेंड्याच्या काठ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली . सिद्धेश्वर यात्रेत मानाच्या झेंड्याच्या काठ्यांची मिरवणूक हे आकर्षण असते. गौरीशंकर मंदिरापासून श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढली जाते. परंपरेनुसार गोजमगुंडे परिवाराच्या वतीने मानाच्या काठीचे पूजन झाल्यानंतर या मिरवणुकीस प्रारंभ होतो . यावर्षीही माजी नगराध्यक्ष तथा देवस्थानचे
इतिहास पाहून तोंड बंद ठेवावं; वारीस पठाण यांना विश्व हिंदू परिषदेचा इशारा