मानाच्या काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक.मानाच्या लातूर /प्रतिनिधी :ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त मानाच्या झेंड्याच्या काठ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली . सिद्धेश्वर यात्रेत मानाच्या झेंड्याच्या काठ्यांची मिरवणूक हे आकर्षण असते. गौरीशंकर मंदिरापासून श्री सिद्धेश्वर मंदिरापर्यंत ही मिरवणूक काढली जाते. परंपरेनुसार गोजमगुंडे परिवाराच्या वतीने मानाच्या काठीचे पूजन झाल्यानंतर या मिरवणुकीस प्रारंभ होतो . यावर्षीही माजी नगराध्यक्ष तथा देवस्थानचे

अध्यक्ष विक्रम तात्या गोजमगुंडे ,विशाल गोजमगुंडे आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या निवासस्थानी विधीयुक्त पूजन करण्यात आले . विक्रम गोजमगुंडे हे देवस्थानचे अध्यक्ष आहेत तर विक्रांत गोजमगुंडे यांना काही महिन्यांपूर्वीच महापौर पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे देवस्थानचे अध्यक्ष आणि शहराचे प्रथम नागरिक असा अनोखा योग यानिमित्ताने जुळून आला .गोजमगुंडे परिवाराच्या वतीने । पूजन करण्यात आल्यानंतर IT मिरवणुकीस प्रारंभ झाला . देवस्थानचे त्यानंतर गौरीशंकर मंदिर येथे । देवस्थानच्या प्रशासक श्रीमती यु एस पाटील, अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे आणि विश्वस्तांच्या । हस्ते काठीचे पूजन झाले .गुळ मार्केट , सुभाष चौक , गंजगोलाई या मार्गे झेंडा मिरवणूक मार्गस्थ झाली . । रात्री उशिरा ही मिरवणूक मंदिरात पोहोचते . पारंपारिक वाद्याच्या गजरात घोड्यावर स्वार झालेले महापुरुष सर्वांचे लक्ष वेधून घेत होते . भजनी मंडळाचे पथक , लेझीम पथक सहभागी झालेले होते . लल हात .


Popular posts
वारिस पठाण यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
हिऱ्यापेक्षा जनता महत्वाची
महाराष्ट्र एनएसएसच्या १४ विद्यार्थ्यांचा राजपथ पथसंचलनासाठी दिल्लीत सराव
इतिहास पाहून तोंड बंद ठेवावं; वारीस पठाण यांना विश्व हिंदू परिषदेचा इशारा